अज्ञात ट्रॅक्टरने रिक्षाला उडविले

0
50
oppo_0

चालकासह चार प्रवासी गंभीर जखमी

साईमत/मलकापूर/प्रतिनिधी

मलकापूर-बुलढाणा मार्गावरील मुंदडा पेट्रोलपंपाजवळ अज्ञात ट्रॅक्टरने रिक्षाला उडविल्याने रिक्षामधील चार प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

मलकापूर येथून प्रवासी घेऊन उमाळी जात असलेल्या रिक्षाला (क्र.एमएच २८ टी २८०४) अज्ञात ट्रॅक्टरने उडविल्याने रिक्षातील चालकासह चार प्रवासी जखमी झाले आहे. त्यापैकी तीन प्रवाशांना पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे. मलकापूर मार्गावरून वाळू वाहतूक सुसाट सुरू आहे. उमाळी जात असलेल्या रिक्षाला ट्रॅक्टरने धडक देऊन पसार झाल्याची घटना घडली. यावेळी स्थानिक नागरिकांनी जखमी प्रवाश्यांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले आहे.

रिक्षा चालक राजेंद्र गिरी (वय ४५) हा गंभीर जखमी झाला आहे. महिला नौशादबी शेख युनूस (वय ४५) आणि शेख युनूस शेख इस्माईल ( वय ५५, तिन्ही रा. उमाळी) यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तिन्ही प्रवासी रुग्णांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना डॉ. नीरज क्षीरसागर यांनी पुढील उपचारार्थ बुलढाणा येथे हलविले आहे. पुढील तपास मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वर्गे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here