साईमत, शिरपुर : प्रतिनिधी
तालुक्यातील सावळदे लगत तापी नदी पुलाववरून एका अनोळखी वृद्ध व्यक्तीने तापी नदीपात्रात उडी घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यावेळी प्रवाशांनी पुलावर गर्दी केली होती.
तालुक्यातील सावळदे येथील तापी नदी पुलावर मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तापी पुलावरून एका अनोळखी व्यक्तीने नदी पात्रात उडी घेतली. सदर वृध्दास उडी घेतांना काही प्रवाश्यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी थांबविण्याचे प्रयत्न केले मात्र पाण्यात पडल्यानंतर काही काळ वृद्ध पाण्यावर तंरगतांना आढळून आला.पण काही व्ोळाने पाण्यात बुडाल्याने त्याचा तपास लागू शकला नाही. पुलावरून काही नागरिकांनी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती दिल्याने पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली मात्र वृद्धाबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. मात्र नदी पात्रात प्रशासनाकडून वृद्धाचा शोध घेतला जात आहे.