Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»Pimpri Fatehpur (Tal. Jamner):नळीने डिझेल ओढताना घडला दुर्दैवी अपघात
    जामनेर

    Pimpri Fatehpur (Tal. Jamner):नळीने डिझेल ओढताना घडला दुर्दैवी अपघात

    saimatBy saimatJanuary 4, 2026Updated:January 4, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     जामनेर तालुक्यातील तरुण चालकाचा चार दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू

    साईमत / पिंप्री फत्तेपूर (ता. जामनेर) /प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पिंप्री फत्तेपूर (ता. जामनेर) येथे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत ३४ वर्षीय तरुण ट्रॅक्टर चालक सलीम गुलाब तडवी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना झालेल्या अपघातात डिझेल थेट पोटात गेल्याने त्यांना तीव्र विषबाधा झाली होती. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी, ४ जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

    प्राप्त माहितीनुसार, १ जानेवारी रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास सलीम तडवी हे आपल्या शेतातील ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत होते. डिझेल कॅनमधून थेट ट्रॅक्टरच्या टाकीत टाकण्यासाठी त्यांनी नळीचा वापर केला होता. नेहमीप्रमाणे नळीने तोंडाने डिझेल ओढत असताना अचानक डिझेलचा दाब वाढला आणि मोठ्या प्रमाणात डिझेल त्यांच्या पोटात गेले. काही क्षणांतच त्यांना चक्कर येऊन उलट्या सुरू झाल्या आणि प्रकृती अत्यंत गंभीर बनली.

    घटनेनंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी तातडीने सलीम यांना उपचारासाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले असले तरी डिझेलमुळे झालेल्या विषबाधेमुळे त्यांच्या शरीरावर गंभीर परिणाम झाला होता. आयसीयूमध्ये त्यांच्यावर सलग चार दिवस उपचार सुरू होते. मात्र अखेर रविवारी मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    सलीम गुलाब तडवी हे अत्यंत कष्टाळू आणि मनमिळावू स्वभावाचे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. ते आपल्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे तडवी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पिंप्री फत्तेपूर परिसरात शोककळा पसरली आहे.

    या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अशा प्रकारे नळीने तोंडाने डिझेल किंवा पेट्रोल ओढण्याच्या धोकादायक पद्धती टाळाव्यात, असे आवाहन जाणकारांकडून करण्यात येत असून या घटनेमुळे इंधन हाताळताना आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pahur : पहूर येथे घरफोडीची धक्कादायक घटना दीड लाखांचा ऐवज लंपास

    March 8, 2026

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.