फैजपूर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवन कार्यपद्धतीची प्रदर्शनी

0
42

साईमत फैजपूर प्रतिनिधी

कै. यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन कार्यपद्धतीचे प्रदर्शनी पांडुरंग सराफ यांच्या निवासस्थानी दिनांक २५ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत लावण्यात आलेले आहे.

या प्रदर्शनीचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रावेर लोकसभा प्रमुख नंदकिशोर महाजन, बी. के. चौधरी, हिरालाल चौधरी, विलास चौधरी, भाजप शहराध्यक्ष अनंता नेहेते, नितीन राणे, जयश्री चौधरी, भारती पाटील, लता मेढे, बापू वाघुळदे, रवींद्र होले, प्रभाकर सपकाळे, संजय सराफ, पांडुरंग सराफ, रामा होले, पिंटू तेली, सिद्धेश्वर वाघुळदे, युगंधर पवार, वसंत कापडे, वसंत परदेशी आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जिवन कार्याची माहिती व केंद्रातील विविध योजनांची माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करण्यात यावे असे यावेळी रावेर लोकसभा प्रमुख नंदकिशोर महाजन यांनी सांगितले.

म्युनिसिपल हायस्कूल व कुसुमताई चौधरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीला भेट देऊन पाहणी केली. यावेळेस शाळेचे शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी केले होते. चंदू कोळी,चेतन पाटील, लोकेश वाघुळदे, विनोद काकडे यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, दिनांक 27 रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत पांडुरंग सराफ यांच्या निवासस्थानी नेत्ररोग रेटिंना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर तपासणी डॉ. मोहित भारंबे करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here