साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी
येथील जुना कानळदा रोडवरील हरी ओम नगर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव 15 ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिटणीस योगेश साळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी रुपेज तुळसकर, आयुष सोनवणे, देविदास बाविस्कर, सरला तुळसकर, कनक सोनवणे, आदिसह हरी ओम नगर मधिल रहिवासी मोठ्या सख्येने उपस्थित होते.