‘Devarai’ Along With Tree Planting : देवराईत वृक्षारोपणासह ‘देवराई एक सचित्र वनगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन

0
6

निसर्ग जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे : प.पू. जनार्दन हरी महाराज

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :  

तालुक्यातील मोयगाव, पिंपळगाव गोलाईत येथील दोन्ही गावातील ग्रामस्थांसह वसुंधरा फाउंडेशन यांनी मिळून आई भवानी देवराईचे निर्माण कार्य हाती घेतले आहे. अशातच प.पू.महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, श्याम चैतन्य महाराज, आंतरराष्ट्रीय कृषी तज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील, सरपंच महेंद्रसिंग कच्छवाह, प्रदीप लोढा, प्रवीणसिंह पाटील, पत्रकार प्रवीण सपकाळे, पं.स.चे माजी सभापती नवलसिंग पाटील, विलाससिंह राजपूत, वनीकरण विभागाचे अधिकारी, जामनेर वनविभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच देवराईसाठी झटणारे डॉ.विश्वजीत भुजंगराव सिसोदिया यांच्या ‘देवराई एक सचित्र वनगाथा’ पुस्तकाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

याप्रसंगी वसुंधरा फाउंडेशनची वृक्षप्रेमी मंडळींसह मोयगाव येथील महिला भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आला. तसेच दोन्ही गावातील ग्रामस्थ मंडळींनी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प.पू.महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, डॉ. के.बी.पाटील यांनी मार्गदर्शन केले.

यांनी व्यक्त केले मनोगत

महाराजांनी निसर्ग जपावा, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन डॉ.के.बी.पाटील यांनी केले. तसेच महेंद्रसिंह कच्छवाह, प्रवीण सपकाळे, डॉ.विश्वजीत सिसोदिया, जीवनसिंह पाटील, नवलसिंग पाटील, डी.एस.पाटील, व्ही.ए‌.पाटील, गजानन कच्छवाह यांनीही मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी मोयगाव, पिंपळगाव गोलाईत गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक एस.आर.पाटील तर आभार मनोहर पाटील यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here