वृक्षासह ट्री गार्डचे प्रभाग क्रमांक दहाला वाटप

0
60

रयत सेना, ‘माझी वसुंधरा’ अभिमानातर्गंत स्तुत्य उपक्रम

साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव :

निसर्गाचा लहरीपणा तसेच दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत जात आहे. म्हणून वृक्ष लागवड करणे खूप गरजेचे झाले आहे.वृक्ष लागवड होवून त्याचे संगोपन व्हावे, या हेतूने पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात रयत सेना आणि चाळीसगाव नगरपरिषद ‘माझी वसुंधरा’ अभिमानातंर्गंत प्रभाग क्रमांक दहामध्ये ५० वृक्षासह ५० ट्री गार्डचे नागरिकांना नुकतेच वाटप करण्यात आले.

पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावणे गरजेचे आहे. झाडे अनेक पक्षी आणि सस्तन प्राण्यांना अन्न, संरक्षण आणि घरे देतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘झाडे लावा झाडे जगवा’ अभियान प्रत्येक संस्था, शाळा, महाविद्यालयात राबविणे गरजेचे झाले आहे. दरवर्षी रयत सेनेच्यावतीने १०० झाडे लावून ती जगविली जात आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या संकल्पनेतून यावर्षी रयत सेना आणि चाळीसगाव नगरपरिषद ‘माझी वसुंधरा’ अभिमान यांच्या संयुक्त विद्यमाने १०० वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.

यांची लाभली उपस्थिती

प्रभागातील नागरिकांना रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे वृक्षाधिकारी तथा उपमुख्याधिकारी राहुल साळुंखे, स्वच्छता निरीक्षक तथा सहाय्यक वृक्षाधिकारी सचिन निकुंभ यांच्या हस्ते वृक्षासह ट्री गार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रभाग दहाचे मुकादम पुरुषोत्तम जाधव, शुभम खैरनार, रमेश पवार, सुनील पवार, निंबा पाटील, रामदास पवार, अमोल पवार, सागर यादव, स्वप्निल गायकवाड, विवेक देठे, तुळशीदास कदम, दिलीप पवार, मांगीलाल पाटील, विजय पवार, प्रणव पवार, विनोद पवार, छभाबाई पवार, एकता पवार, पुष्पा पवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here