Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»Akkalpada Dam : अक्कलपाडा धरण : ४१५ कोटीची नवीन प्रशासकीय मान्यतेस मंजुरी
    धुळे

    Akkalpada Dam : अक्कलपाडा धरण : ४१५ कोटीची नवीन प्रशासकीय मान्यतेस मंजुरी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 19, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    माजी मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांना यश

    साईमत/धुळे/प्रतिनिधी :

    साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरण (निम्न पांझरा प्रकल्प) २०१८ मध्ये पूर्ण झाले. परंतु आज अक्कलपाडा धरण पूर्ण भरता येत नाही.शासनाच्या नियमानुसार फक्त ६५ टक्के भरले जाते जर कधी १०० टक्के धरण भरले तर जी जमीन अधिग्रहीत नाही. त्या जमिनीत धरणाचे पाणी जाते. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. त्यामुळे धरण फक्त ६५ टक्के भरले जाते. त्यापेक्षा जास्त पाणी आले तर त्याचा विसर्ग करावा लागतो. अश्या रितीने ३५ टक्के पाणी म्हणजे १.६ टीएमसी क्षमतेचे धरण बांधायचे असेल तर त्याला खर्च येतो ८०० कोटी रुपये म्हणून शेतकऱ्यांची मागणी आहे की, अक्कलपाडा धरण १०० टक्के भरण्यासाठी १९८ हेक्टर जमीन जर अधिग्रहण केली तर अक्कलपाडा धरण १०० टक्के भरू शकते आता अक्कलपाडा धरणाची क्षमता २.७५ टीएमसी आहे. म्हणजे ही जमीन अधिग्रहण केली तर अजून १.६ टीएमसी पाणी जास्तीचे वाढेल त्याचा फायदा धुळे तालुक्यातील शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी होऊ शकतो.

    गेल्या ३ वर्षापासून माजी मंत्री डॉ.सुभाष भामरे यासाठी प्रयत्न करीत आहेत. २० डिसेंबर २०२२ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांना पत्र दिले होते. त्यांना अक्कलपाडा १०० टक्के भरणे किती महत्वाचे आहे, हे समजावून सांगितले. त्यांनी ताबडतोब अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. हे काम करायचे आहे, अशा सूचना दिल्या. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी अक्कलपाडा धरण १०० टक्के भरण्यासाठी १९८ हेक्टर जमीन भूसंपादन करण्यासाठी तत्त्वतः मान्यता दिली. त्यामुळे ह्यासाठी मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला. चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतासाठी त्यांना विनंती केली. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक लावली होती. १९८ हेक्टर जमीन अधिग्रहण करण्याचा मार्ग मोकळा होत आहे. त्यासाठी ४१५ कोटी रुपये लागणार आहे. धुळे तालुक्यासाठी सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. तसेच शहरासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल. याकामी डॉ. सुभाष भामरे यांच्या ३ वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आहे. बैठकीत अक्कलपाडा धरणाच्या भूमी अधिग्रहणासाठी ४१५ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.

    मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्र्यांसह सर्वांचे मानले आभार

    याबद्दल माजी मंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल तसेच अक्कलपाडा संघर्ष समितीचे कार्यकर्ते संग्राम पाटील, शंकरराव खलाणे, संजय मराठे, संघर्ष समितीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही माजी मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने अशा सर्वांचे आभार मानले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dhule : धुळ्यातील पिंपळनेर हादरले; आनंदोत्सवात धारदार शस्त्रांचा कहर

    February 20, 2026

    Taloda:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तळोदा महाविद्यालयात अभिवादन

    January 3, 2026

    Navapur:“नवापूर नगराध्यक्षांचे दालन नागरिकांसाठी सदैव खुले; नवापूरमध्ये लोकशाही संवादाला नवे बळ”

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.