Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»लोहाऱ्यात अखंड हरिनाम कीर्तन, श्रीमद्‌ भागवत कथा सप्ताहाला प्रारंभ
    पाचोरा

    लोहाऱ्यात अखंड हरिनाम कीर्तन, श्रीमद्‌ भागवत कथा सप्ताहाला प्रारंभ

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 16, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, लोहारा, ता.पाचोरा ः वार्ताहर

    येथे श्री भगवान नरसिंह महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम किर्तन व श्रीमद्‌ भागवत कथा सप्ताहाला वैशाख १५ मे ला तर २२ मे रोजी सांगता होणार आहे. सप्ताहाचे यंदाचे सहावे वर्ष आहे. त्यामुळे भाविक भक्त श्रीमद्भागवत कथेचा लाभ घेत आहेत. श्रीमद्‌ भागवत कथाकार ह.भ.प. धनश्रीताई ठाकरे (कोळगाव, भोकरदन) यांच्या मधुर वाणीतून धर्म, संस्कृतीवर मार्गदर्शन करणार आहे.

    सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमात पहाटे काकडा आरती, सकाळी ८ ते ११ व दुपारी ३ ते ५ श्रीमद्‌ भागवत कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८:३० ते १०:३० हरी किर्तन होईल. रात्री होणाऱ्या किर्तनात १५ मे ला ह.भ.प. संदीप महाराज पवार (रेवडगाव, कन्नड), १६ ला ह.भ.प. कु.स्नेहल दीदी महाराज पळसखेडा, १७ ला ह.भ.प. जयाताई महाराज वडगाव टीग्री, १८ ला ह.भ.प. खुशाल महाराज, यावल, १९ ला ह.भ.प.धनश्रीताई महाराज भोकरदन, २० ला ह.भ.प. नेहाताई महाराज सोनारी, २१ ला ह.भ.प.पंढरीनाथ महाराज पवार, गारखेडा, २२ ला ह.भ.प. गुरुवर्य प्रेममूर्ती कन्हैयाजी महाराज, राजपूत मीराबाई आश्रम यांचे सकाळी ९ ते ११ या वेळेत काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर ११ ते २ महाप्रसाद होईल. दिंडी सोहळा २१ मे रोजी दुपारी ३ ते ५ होईल.

    सप्ताहात मृदंगाचार्य सेवा ह.भ.प वैभव महाराज, ह.भ.प.शिवम महाराज, गायनाचार्य ह.भ.प धोंडोजी महाराज, ह.भ.प.अर्जुन महाराज, बापू महाराज, विकास महाराज, सचिन महाराज, विजय महाराज, पेटीवादक ह.भ.प.रामभाऊ पांढरे, विणेकरी ह.भ.प. सुभाष महाराज, ह.भ.प.गजानन महाराज सेवा देत आहेत.

    यशस्वीतेसाठी गोकुळ चौधरी, संतोष गुजर, राजेंद्र देशमुख, रमेश भोसांडे, सचिन कोळी, दत्तू चौधरी, राजू चौधरी, ज्ञानेश्‍वर भोसांडे, सुरेश गुजर, रमेश पाटील, विनोद चौधरी, संतोष देशमुख, योगेश कोळी, शरद कोळी, पाणी टँकर सेवा सुभाष देशमुख, क्रांतिवीर भगतसिंग मित्र मंडळ, श्री बालाजी भजनी मंडळ, लोहारा, कळमसरा, महसास, रामपुरा, नांद्रे, शेंदुर्णी, कुऱ्हाड येथील भजनी मंडळ परिश्रम घेत आहेत. सप्ताहाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी भजनी मंडळ, लोहारातील समस्त ग्रामस्थ मंडळींनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.