‘हवेला वजन’ असते कृतियुक्त शिक्षणातून प्रगती विद्यामंदिर शाळेत अभ्यासाचे धडे

0
13
'हवेला वजन' असते कृतियुक्त शिक्षणातून प्रगती विद्यामंदिर शाळेत अभ्यासाचे धडे

साईमत जळगांव प्रतिनिधी

विद्यार्थ्याच्या सर्वांगीन विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना कृतियुक्त व स्वानुभवातून शिक्षण देणे महत्वाचे ठरते. या पद्धतीनुसार प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे ‘हवेला वजन’ असते. हा हवेचा गुणधर्म विद्यार्थ्यांना स्वानुभवातून समजावा यासाठी त्यांनी ते विद्यार्थ्यांचा कृत्युयुक्त सहभाग घेऊन त्याना हवेलाही वजन असते हे सिद्ध करून दाखवले.यात त्यांनी सारख्या आकाराचे दोन फुगे घेतले, एक स्ट्रॉ ,तसेच एक बारीक दोरा घेतला.सर्वप्रथम त्यांनी स्ट्रॉ घेतला.

स्ट्रॉ ला मध्यभागी दोरा बांधला व असा टांगला की तो बरोबर आडव्या रेषेत राहील.स्ट्रॉच्या दोन टोकांना दोन सारख्या आकारांचे रबरी फुगे बांधले. स्ट्रॉ आडव्या रेषेत राहील. आता त्यांतील एक फुगा काढला आणि तो फुगवून परत काडीला पूर्वीच्या जागी बांधला. आता स्ट्रॉ आडव्या रेषेत राहते का ? फुगवलेला फुगा बांधलेले काडीचे टोक खाली जात असल्याचे विद्यार्थ्यांना दिसलें. म्हणजे हवेला वजन असते. हवा हे वायूंचे मिश्रण असल्याने इतर पदार्थांप्रमाणेच हवेलासुद्धा वस्तुमान आणि वजन आहे.हे त्यांनी सिद्ध केले. असा लहान लहान कृतीतूनही विज्ञान शिकता येते हे बघून विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटले.

या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल, अध्यक्षा मंगलाताई दुनाखे,मुख्याध्यापिका सांगिता गोहील तसेच पालकवर्ग यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here