साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
जिल्हास्तरावरील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल येथे आहे आदिवासी विभागात कोट्यावधी रुपयांचा निधी येत असतो जिल्ह्यात 34 अनुदानित आश्रम शाळा आहेत.गेल्या दिवाळीत आदिवासी विभागातून शासकीय स्तरातून जवळच्या तालुक्यातील प्रतिनिधींना देण्यासाठी 2 लाख 40 हजार रुपये गोळा करण्यात आले होते. ही जमा झालेली रक्कम जिल्ह्यातील एका ठिकाणचे सर्व प्रतिनिधी माझ्या खिशात आहे असे सांगून एका प्रतिनिधीने कोणत्याही प्रतिनिधीला न सांगता आपल्या सहकारी प्रतिनिधीच्या नावावर 1 लाख 40 हजार रुपये घेतले आणि ते कोणालाही वाटप केले नाही ती संपूर्ण रक्कम त्या प्रतिनिधीने एकट्याने पचविली.ही सर्व वस्तुस्थिती इतर कोणत्याही प्रतिनिधींना माहिती नाही (आणि इतर प्रतिनिधींना दोन वर्षापूर्वी मिळालेल्या गिफ्ट कुकरमध्ये तांदळाचा एक दाणा सुद्धा मिळाला नाही आणि कुकर नंतर प्रतिनिधींना एक रुपया सुद्धा दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे ) परंतु दि.27 जून 2022 रोजी यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात ही माहिती वस्तुस्थिती,सत्य समोर आले आहे.
तसेच ते प्रतिनिधी माझ्या सोबत असतात आणि तसे छायाचित्र दाखवून सर्व माझ्या खिशात आहेत असा दबदबा आणि वर्चस्व दाखवून दरमहा प्रतिनिधींना वाटप करण्याच्या नावाखाली 20 हजार रुपये घेतले आहे,(घेणारा कोण आत्मचिंतन करावे लागणार…) त्यातील 20 रुपये सुद्धा त्या प्रतिनिधींना आज पर्यंत मिळालेले नाही.ही सत्य आणि वस्तुस्थिती आहे.
तरी स्वतःला बुद्धिमान समजणार्या काही प्रतिनिधींनी या प्रकरणाचा छडा लावून वेळीच समयसूचकता बाळगावी आणि बेअक्कलपणे प्रतिनिधीचे काम करणे बंद करावे आणि स्वतःच्या हिमतीवर आणि लेखणीच्या ताकदीवर पत्रकारिता करावी आणि प्रतिनिधींच्या टाळूवरील लोणी खाणारा तो कोण याचा शोध घ्यावा आणि सत्य फार कडू असते याचा अनुभव घ्यावा असे जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.
आदीवासीतील विकास हा आपल्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्याचा विकास करताना आपल्या सहकाऱ्याची दिशाभूल करीत ठराविक एक दोन प्रतिनिधीनाच विश्वासात घेऊन माझ्यासारखा हुशार आणि कर्तव्यदक्ष कोणी नाही असा त्याचा समज झालेला असल्याने नाशिक आदिवासी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भूतकाळातील शासकीय चांगल्या कर्तव्याची माहिती आता जनतेला समजणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आदिवासी विभागात आपला एक खास वरिष्ठ अधिकारी असल्याने विकास कामे करताना त्याच्या विरोधात कोणी काही कोणत्या प्रकारे प्रसिद्धी केल्यास भररस्त्यात त्याच्या पोटात चाकू खुपसून टाकेल असा दम सुद्धा यावल येथील एका माजी अध्यक्षकाने दिला होता याबाबत सुद्धा आता चर्चेला उधाण आले आहे.