अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई

0
4

रावेर : प्रतिनिधी

एकाच रात्री तीन वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रावेर तालुक्यात पाल-खरोदा दरम्यान दोन ४०७ गाड्यांवर तर रावेर शहरात एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवर अवैध वाळू वाहतूक करतांना महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे.

तहसीलदार बंडू कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री वेगवेगळे पथक तयार करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुध्द धडक मोहीम राबविण्यात आली. त्यात पाल-खिरोदा दरम्यान एमएच १० एक्यू ५५०० नंबरची ४०७ पिकअप, एमएच २० सियु ०२७९ ४०७ पिकअप दोन्ही गाड्यांमध्ये वाळू भरलेली होती. एमएच २८ डी ११४५ नंबरचे ट्रॅक्टर-ट्रॉली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पकडण्यात आले. महसूल पथकाने केलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. कारवाईत मंडळाधिकारी निंभोरा, पाल, सावदा, खिरोदा, रावेर, खानापूर, तलाठी मस्कावद, पाल, खानापूर, रावेर मंडळ अधिकारी तलाठी यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here