जिल्ह्यात अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या 31 वाहनांवर केली कारवाई

0
23
जिल्ह्यात अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या 31 वाहनांवर  केली कारवाई

साईमत जळगाव प्रतिनिधी

जिल्ह्यात अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या 31 वाहनांवर बुधवारी कारवाई करण्यात आली, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जून ते 28 जून या कालावधीत जिल्ह्यातील अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या 31 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी केली. कारवाई केलेले संबंधित वाहने ही तालुक्याच्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहेत. यामध्ये वाळू वाहतूक करणारे 17 डंपर, 17 ट्रॅक्टर्स, तीन टेम्पो आणि 1 ओमनी व्हॅन अश्ाा वाहनांचा समावेश आहे.

यासंदर्भात जळगाव तालुक्यात गौणखनिज वाहतूक करणाऱ्या 3 वाहनांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी आज सायंकाळी 5 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here