जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांच्या हस्ते जीपीएस गणेशाची आरती

0
12

भाविक महिलांना ९०० बास्केट केल्या वितरित

साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी :

येथील जीपीएस मित्र मंडळाच्यावतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दररोज विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे. अशातच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सपत्नीक श्री गणेशाची व आरास उभारलेल्या विठ्ठल-रुक्मिणीची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविक महिलांना ९०० बास्केट वितरित केल्या.

यावेळी झालेल्या भजन संध्या कार्यक्रमात ह.भ.प.मयूर महाराज, दिनेश महाराज, परमेश्वर महाराज, कृष्णा महाराज यांच्या मधुर वाणीतून भजन संध्या सादर करण्यात आली. यशस्वीतेसाठी जीपीएस मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here