साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी
तालुक्यातील निंबायती येथील शेतकरी पुत्र गणेश कौतिक सुस्ते यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल निंबायती येथील कै. वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय येथे सत्कार करण्यात आला गणेश सुस्ते यांचे दहावी पर्यतचे शिक्षण हे याच विद्यालयात झाले.
सत्कार प्रसंगी कै.वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक यशवंत चौधरी यांच्यासह विलास चौधरी,समाधान शेळके,संजय पाटील,दिनेश पाटील,लिपीक गजानन राठोड,सेवक ज्ञानेश्वर तेली, बेबीबाई राठोड , व विद्यार्थी उपस्थित होते.