जळगावात समता नगरातील तरुणाचा झोपेतच मृत्यू

0
6

शासकीय रुग्णालयात कुटुंबियांचा आक्रोश, रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील समतानगर भागातील रहिवासी २० वर्षीय तरुणाचा सोमवारी, ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता झोपेतच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शासकीय रुग्णालयात कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. या घटनेमुळे नातेवाईकांसह मित्रांनाही त्याच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते. दरम्यान, सागर अशोक नन्नवरे (वय २०, रा. समता नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याचे सांगण्यात आले.

सागरच्या पश्चात आई सुनीता, वडील अशोक आणि बहीण असा परिवार आहे. सागर नन्नवरे हा पेंटिंगचे काम करतो तर त्याचे आई-वडील हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. रविवारी, ६ जुलै रोजी रात्री तो नेहमीप्रमाणे जेवण करून झोपला. सोमवारी सकाळी त्याची आई सुनीता नन्नवरे कामावर गेल्यानंतर सागर झोपेतून उठला. कॉलनीत तो फिरून आला. त्याने काही मित्रांसोबत वेळ घालवला. त्यानंतर तो पुन्हा घरी येऊन झोपी गेला. सकाळी १० वाजता सुनीता नन्नवरे कामावरून घरी आल्या. मुलाला कामाला उशीर होत असल्याचे सांगत त्यांनी सागरला उठविण्यासाठी हाक मारली. मात्र, सागरने कोणताही प्रतिसाद दिला नाही.

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे आई-वडिलांना बसला मोठा धक्का

झोपेतच असणाऱ्या सागरने आवाज देऊनही काहीच प्रतिसाद न दिल्याने त्याची घाबरली. त्यानंतर त्याच्या आईने त्याला पुन्हा उठविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आईनेही तात्काळ बाहेर येऊन सागरच्या मित्रांना त्याची माहिती दिली. त्याच्या मित्रांनी कोणताही वेळ न गमाविता त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून सागरला मृत घोषित केले. एकुलत्या एक मुलाच्या अकस्मात मृत्यूने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. सागरचा मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला होता. सागरच्या शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here