साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कल्याणेहोळ येथील ३३ वर्षीय तरूणाचा तोल जावून नदीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी, २० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कल्पीत जगन्नाथ निकम (रा. कल्याणेहोळ, ता.धरणगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
सविस्तर असे की, कल्पीत निकम हा आपल्या परिवारासह धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ येथे वास्तव्याला होता. बुधवारी, २० सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास गावाच्या बाहेर असलेल्या नदीच्या किनाऱ्याजवळून जात होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्यातच त्याचा बूडून मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेवून बाहेर काढून तातडीने धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. तपास पोलीस नाईक दीपक पाटील करीत आहे.