साखळी बंधाऱ्यांमुळे बोरी बारमाही होण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल

0
13

साईमत, धुळे । प्रतिनिधी

तालुक्यातील बोरकुंड परिसरातील बोरी नदीवर चार कोटींतून तीन साखळी बंधारे बांधण्यात आले. तिन्ही बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले. बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या प्रयत्नातून बंधारे आकारास आले आहेत. बंधाऱ्यांचे जलपूजन जिल्हा परिषद सदस्या शालिनी भदाणे यांच्या हस्ते झाले. महिला पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. बोरी बारमाही करणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दिशेने हे पुढचे पाऊल असल्याने समाधान व्यक्त झाले.

बोरी बारमाही करण्यासाठी बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे व सदस्या शालिनी भदाणे यांचे अविरत प्रयत्न आहेत. यासाठी त्यांच्याजवळ महत्त्वाकांक्षी ॲक्शन प्लान आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या साठवण बंधाऱ्यांमुळे बोरीचे बारमाहीचे स्वप्न साकारताना दिसत आहे. मांडळपासून ते बोरकुंड-रतनपुरा- दोंदवाड गावादरम्यान बोरी नदीवर लाखो रुपयांचे फेजर गेट-साखळी बंधारे झाल्याने बोरी बारमाही होण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे. रतनपुरा-बोरकुंडसह इतर गावांच्या पाणीपुरवठा योजनेतील उद्भव विहिरींच्या पाण्याची पातळी वाढून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

यांची होती उपस्थिती
जलपूजनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अनिता पाटील, सरपंच सुनीता भदाणे, उपसरपंच सविता माळी, माजी सरपंच मंगला माळी, कमल माळी, ग्रामपंचायत सदस्या आशा भदाणे, रूपाली भदाणे, बेबा र् देवरे, सविता पाटील, मंगला माळी, रेखा भदाणे, माधुरी अहिरे, ममता भदाणे, पारीख, प्रमिला भदाणे, मंगला भदाणे, कमल भदाणे, अलका भदाणे आदी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here