साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
शहरातील एम.एम.कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, म.गांधी चौक या भागात स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेतर्फे महेश कौडिण्य लिखीत ‘गोष्ट स्वातंत्र्याची’ पथनाट्याचे आयोजन केले होते. यावेळी गो.से.हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचे उपस्थितांकडून कौतूक करण्यात आले. शहरातील तीनही भागात आयोजित केलेल्या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, शहरातील नागरिकांनी उपस्थिती दिली.
पाचोरा शहरातील स्वातंत्र्य लढ्याचे योगदान तसेच स्वातंत्र्य लढ्यात शिरीष कुमार, चले जाव आंदोलनातील प्रेरक प्रसंग पथनाट्यात सादर करीत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. गांधी चौकात झालेल्या कार्यक्रमात पथनाट्याचे लेखक महेश कौंडिण्य यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी बाविस्कर यांच्याकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पंचप्रण शपथ आणि राष्ट्रगीताने करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास पीटीसी चेअरमन संजय वाघ, प्रांताधिकारी भूषण अहिरे, गो.से.हायस्कूल मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, ए.बी.अहिरे, भोला आप्पा, माजी नगराध्यक्ष बापू सोनार, नाना देवरे, सुनील सराफ, नंदू सोनार, किशोर डोंगरे, गजानन जोशी, न.पा.चे उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर अधीक्षक दगडू मराठे, संजय बाणाईते, मधुकर सूर्यवंशी, ईश्वर सोनवणे, जितेंद्र मोरे, नगररचनेचे काबरा, ललित सोनार, भारती निकुंभ, प्रगती खडसे, प्रकाश पवार, विलास देवकर, विशाल दिक्षीत, विलास कुंभार, किशोर मराठे, संदीप खैरनार, रवी पवार, सुशिल पवार, विठ्ठल पाटील, शाम ढवळे, महेंद्र गायकवाड, भागवत पाटील, गजानन पाटील आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन सी.एन.चौधरी तर मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी आभार मानले.