चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ शिरपुरला तहसीलदारांना सर्वपक्षीयांतर्फे निवेदन

0
32

साईमत, शिरपूर : प्रतिनिधी

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील चिमुकलीवर अत्याचार करीत निर्घुण हत्येच्या निषेधार्थ शिरपूर तहसीलदारांना शिरपूर शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांतर्फे निवेदन देत आरोपींना फाशीची शिक्षेसह विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच देण्यात आले. तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांनी चिमुकलींच्या हस्ते निवेदन स्वीकारले. याप्रसंगी शहरासह तालुक्यातील राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांसह महिला उपस्थित होत्या.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील ९ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करीत निर्घुण खून करण्यात आल्याची अमानवीय घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी व त्याला सहकार्य करणाऱ्यासह आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी करीत घटनेचा निषेध व्यक्त करून पीडित बालिकेच्या मारेकऱ्यांची सी.आय.डी.मार्फत चौकशी करत समितीवर निवृत्त न्यायाधीशांची नियुक्त करावी. घटनेचा जलद गती न्यायालयात केस चालविण्यात यावी, यासाठी विधीतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच न्यायालयीन खर्च शासनाने करावा, आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here