दै. ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांच्या हस्ते उद्घाटन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गेल्या सहा वर्षांपासून निखील पाटील आणि वेदांत चाळसे हे युवक शिक्षण घेत असतानाच समाजासाठी उपयोगी कार्य म्हणून शहरातील काव्यरत्नावली चौकात “ना नफा ना तोटा” तत्त्वावर दिवाळी फराळ स्टॉल लावत होते. यंदाही ही परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी दोन विद्यार्थ्यांना संधी दिली. बी.फार्म.चे विद्यार्थी पार्थ पाटील आणि राहुल पिसाळ यांनी यंदा स्टॉलचे आयोजन सांभाळले. त्यांच्या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. स्टॉलचे उद्घाटन दै. ‘साईमत’चे संपादक प्रमोदभाऊ बऱ्हाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी उपमहापौर सुनील खडके, भास्कर पाटील, बापूसाहेब पाटील, माजी नगरसेवक अमित भाटिया, नंदू पाटील, माजी शहर अभियंता शशिकांत बोरोले, विक्की सोनवणे, शिवा पाटील, लकी पाटील, सोहम खडके, ललित वराडे, मंथन ईशी, हार्दिक पाटील, मयूर सपकाळे यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते.
भक्तिभाव आणि उत्साहाने भरलेल्या वातावरणात स्टॉलमध्ये दिवाळी फराळाची दुकाने सुरू झाली. स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता पहायला मिळाली. या उपक्रमातून समाज सेवा आणि पारंपरिक उत्सवांची जाणीव एकत्र येत असल्याचे दिसून आले.



