Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याने संपविले जीवन
    क्राईम

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याने संपविले जीवन

    saimatBy saimatMarch 9, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Chalisgaon: A police officer in Chalisgaon taluka committed suicide.
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने घेतला गळफास

    साईमत/चाळीसगाव / प्रतिनिधी

    जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली असून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    निलेश पाटील असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथील रहिवासी होते. रविवारी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

    मिळालेल्या माहितीनुसार, निलेश पाटील हे जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दरम्यान, कोदगाव येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले. कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तातडीने स्थानिक पोलिसांना कळविण्यात आले.

    घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून निलेश पाटील यांचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

    दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. निलेश पाटील हे नैराश्यात होते का किंवा कोणत्या तणावाखाली होते का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

    या दुर्दैवी घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात शोककळा पसरली असून सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, चाळीसगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Amalner : भरधाव दुचाकीची भीषण धडक विटनेर येथील ४८ वर्षीय प्रौढाचा मृत्यू

    March 9, 2026

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026

    Pahur : पहूर येथे घरफोडीची धक्कादायक घटना दीड लाखांचा ऐवज लंपास

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.