साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा आणि भडगाव तालुक्याला सामाजिक बांधिलकीतून ‘डास मुक्त’ करण्यासाठी शिवसेना उबाठाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी फवारणीचा उपक्रम सुरु केला आहे. त्याची सुरुवात पाचोरा शहरातून २३ ऑक्टोबरपासून सुरु केली आहे. ‘डासमुक्त शहर’ संकल्पना वैशाली सूर्यवंशी यांनी स्वखर्चातून राबवून सेवाभावी उपक्रम जपला आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
पाचोरा, भडगाव तालुक्यातील डेंग्यूची लागण नियंत्रणात आणण्यासाठी तथा नागरिकांचे तसेच त्यांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी (आरोग्य तुमचे काळजी आमची) सामाजिक बांधिलकीतून पाचोरा येथील निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून वैशाली सूर्यवंशी यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल फवारणी झालेल्या भागातील परिसरातील रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. नागरिकांना डासापासून मुक्ती भेटत आहे. अशाही प्रतिक्रिया नागरिकांकडून वारंवार मिळत आहे. फवारणीचा उपक्रम शहरातील प्रमुख भागांमध्ये आतापर्यंत राबविण्यात आला.
उपक्रमासाठी उबाठाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, कॉलनी वासियांची मदत लाभली. ही फवारणी राजेंद्र गायकवाड, गोकुळ गांगुर्डे, श्रीधरमसिंग पाटील, डी.डी.नाना यांच्या निरीक्षणाखाली सुरु आहे.