साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तमाम शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी खासदार उन्मेश पाटील आणि माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी, २१ जून रोजी एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरत आहे.
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर होत असलेल्या धरणे आंदोलनाला हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांसह नागरिक, मविआचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सकाळी १०:३० वाजता चाळीसगावातील तहसील कार्यालयाच्या आवारात उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे चाळीसगाव तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे यांनी केले आहे.



