फैजपुरात आदिवासी टोकरे समाजातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन

0
43

प्रांताधिकारी कार्यालयात दिले प्रमुख मागण्यांचे निवेदन

साईमत/सोयगाव/प्रतिनिधी

येथे आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनात प्रभाकर सोनवणे, महेश सोनवणे, मंदा सोनवणे, शोभा कोळी, सरिता कोळी, रावेर, यावल तालुक्यातील सर्व कोळी जमात महिला, पुरुष यांची उपस्थिती होती.आंदोलनाचे आयोजन कोळी समाजाचे अध्यक्ष दिलीप कोळी, संतोष कोळी शहरातील कोळी समाज बांधव, भगिनी यांनी केले होते. प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार जगदीश गुरव यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये हलके गाव कामगार इनाम वर्ग ६ ब जमिनच्या सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६व ३६ ‘अ’च्या बंधनास पात्र आदिवासी जमिनीवर ३६ व ३६ अ नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी यांच्याकडून होत असलेला अन्याय दूर करावा. आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळीचे जात प्रमाणपत्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६ व ३६ ‘अ’चा पुरावा ग्राह्य धरूनच जात प्रमाणपत्र निर्गमित करावे.

आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जात प्रमाणपत्र देताना रक्त नात्यातील म्हणजेच वडील, भाऊ, काका, आजोबा यापैकी कोणतेही जात प्रमाणपत्र असले तरी अर्जदारास प्रमाणपत्र निर्गमित करावे. (वैद्यता प्रमाणपत्र मागू नये). आपल्या कार्यालयातून शासनाने दिलेल्या कालावधीतच जात प्रमाणपत्र निर्गमित करावे. आपल्या कार्यालयात प्रलंबित असलेले अर्ज आजच्या तारखेत अर्ज मंजूर करून जात प्रमाणपत्र निर्गमित करावे, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here