जळगाव : शिवसेना व रोटरॅक्ट क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने काल बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी ‘कोरोना’ काळात गौरवास्पद कामगिरी करणार्या जळगाव शहर पोलिस ठाण्यातील निरीक्षक श्री. विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह कर्मचार्यांचा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या शुभ हस्ते प्रशस्तिपत्र व गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख (जळगाव शहर-ग्रामीण, अमळनेर) श्री.विष्णू भंगाळे तसेच रोटरॅक्ट क्लब जळगावचे पदाधिकारी व शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
