जळगाव : शहरातील भारत विकास परिषद, शाखा जळगाव देवगिरी प्रांततर्फे काल बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी नेहरू चौक भागात प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या शुभ हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भारत विकास परिषदेचे श्री.विशाल चोरडिया, श्री.पीयूष गांधी यांच्यासह पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
