जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३४४ कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे तर दुसरीकडे १५७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर ६९ , जळगाव ग्रामीण १५ , भुसावळ५५ ,अमळनेर ३ ,चोपडा ५२ , पाचोरा १५ , भडगाव २ , धरणगाव ७ , यावल १३ , एरंडोल ११ , जामनेर १०, रावेर २०, पारोळा १३ , चाळीसगाव २३ , मुक्ताईनगर १२ , बोदवड १७ , इतर जिल्ह्यातील ७ असे एकूण ३४४ कोरोना बाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४८ हजार २२९ पर्यंत पोहोचली असून एक लाख ४२ हजार २१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे , त्यानुसार आतापर्यंत २५८३ रुग्णांचा मृत्यू झालेले आहे.तर ३४३० रुग्ण सध्या उपचार घेत आहे