जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीतर्फे सभासद नोंदणी

0
61

जळगाव : प्रतिनिधी

येथील सुप्रिम कॉलनी (वॉर्ड क्रमांक, 19) मध्ये परिसरातील महिलांची बैठक  मंगला पाटील जिल्हा महानगर अध्यक्षा, यांचे अध्यक्षतेत घेण्यात आली.यावेळी महानगर सरचिटणीस रुपाली पाटील, ॲड. सचिन पाटील, सीमा गोसावी प्रभाग प्रमुख,एड सुरेश पाटील, ॲड.विजय पाटील यांचे प्रमुख उपस्तीत कार्यक्रम झाला.
यावेळी महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे ध्येय धोरणे बाबत ,आदरणीय शरद चंद्र पवार,  सुप्रिया ताई, रुपाली ताई चाकणकर यांनी महिला बाबत केलेले कार्य बद्दल माहिती देण्यात आले.तसेच परिसरातील नागरिकांची विविध दैनंदिन समस्यां जाणून घेण्यात आली. व भविष्यात काही समस्या निर्माण झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी तुमच्या सोबत असून अर्ध्या रात्री ही काही समस्यां आल्यावर ही मंगला ताई व पक्ष आपल्या सोबत आहे.
या वेळी 40 महिलांनी आपली सभासद नोंदणी केली आहे. या वेळी परिसरतील अककाबाई गवळी, सुरेखा ताई महाजन,
प्रतिभा गवळी, लताबाई कोळी,  शुभांगी महाजन,  अशा असंख्य महिलांची उपस्तिथी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here