जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनी येथे लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने मोफत रेशन कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २२ रोजी आज सुप्रीम कॉलनी येथे लोकसंघर्ष मोर्चा आयोजित मोफत रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, राहुल पाटील, मोरया बहुद्देशीय संस्था अध्यक्ष भरत कर्डिले, लोकसंघर्ष मोर्चा जिल्हाध्यक्ष युवक व समस्त युवक आदी उपस्थित होते.
