जळगाव, प्रतिनिधी । हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त युवासेना जळगाव महानगरतर्फे विनामूल्य युनिव्हर्सल पास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर रविवार व सोमवार दि. २३ ते २४ जानेवारी २०२२ दरम्यान युवासेना मध्यवर्ती कार्यालय, खान्देश मिल कॉम्प्लेक्स, नेहरू चौक, जळगाव येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. लसीचे दोन डोज घेतलेल्या नागरिकांना सदर युनिव्हर्सल पास बनवून घेता येणार आहे. सार्वजनिक प्रवासासाठी तसेच मॉल्स, सिनेमा गृह इत्यादी ठिकाणी प्रवेशासाठी सदर पास सक्तीने लागणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी युवासेने मार्फत युनिव्हर्सल पास बनवून घ्यावी, असे आवाहन युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया, जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, युवासेना महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी व विशाल वाणी आदींनी केले आहे.
