Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»नगरपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या यशाचा जळगावात जल्लोष
    जळगाव

    नगरपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या यशाचा जळगावात जल्लोष

    saimat teamBy saimat teamJanuary 20, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी १२ व लातूर जिल्ह्यातील चाकुर नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी ६ जागा व यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव नगरपंचायत निवडणुकीत १ जागा जिंकत दमदार कामगिरी करणाऱ्या बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाच्या यशाचा जल्लोष पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जळगावात साजरा केला.

    राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाने नेहमीच शेतकरी,कष्टकरी,कामगार, महिला व अपंग आदी शोषित वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला आहे. पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी १२ जागा जिंकत दमदार कामगिरी केली आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील चाकुर नगरपंचायत निवडणुकीत सुध्दा १७ पैकी ६ जागा जिंकून मराठवाड्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. पक्षाचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहचविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष-बल्लू जवंजाळ,बुलडाणा जिल्हा प्रमुख-वैभवराजे मोहिते,पक्ष निरिक्षक-गजानन लोखंडकार यांनी विशेष संघटन बांधणी केली. त्यामुळे प्रहार पक्षाला राज्यात पार पडलेल्या विविध निवडणुकीत चांगले यश मिळत आहे.

    जळगाव शहरात प्रहार जनशक्ती युवक आघाडीचे शहराध्यक्ष निलेश बोरा,सागर गवळी, लक्ष्मण पाटील, हरीश कुमावत, जितेंद्र वाणी,धनंजय आढाव,अनिल बिऱ्हाडे,समाधान पवार,गोपीचंद मराठे;गणेश माळी,मो.इकबाल काकर,अभिजित बाविस्कर, ॲड. प्रदीप जी.सोनवणे,दिलीप शिंपी,समीर सोनवणे,हरीश अंभुरे,राजू पाटील,योगेश देशमुख,कमलाकर इंगळे,मोहन माळी, आदी कार्यकर्त्यांनी पेढे भरवून पक्षाच्या यशाचा जल्लोष साजरा केला. यावेळी आगामी जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे उमेदवार सर्व जागांवर उभे करून त्यांना निवडून आणण्याचा संकल्प प्रहारच्या कार्यकर्त्यांनी यावेळी निर्धार व्यक्त केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.