Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात नवी नियमावली जाहीर
    राज्य

    राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात नवी नियमावली जाहीर

    saimat teamBy saimat teamJanuary 9, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, वृत्तसंस्था । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत नवी नियमावली जाहीर केली आहे.

    यात स्विमिंग पूल, स्पा आणि जीम पुन्हा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय पुन्हा एकदा नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत ही अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. या काळाच पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरण्यावर निर्बंध असतील. 10 जानेवारी मध्यरात्रीपासून ही नवी नियमावली लागू होईल.

    कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे दिसते. नव्या नियमांचे कठोर पालन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

    मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळ पूर्णपणे बंद राहतील. सरकारी कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकी घ्याव्या अशा सुचना करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेनं सुरु राहतील. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत त्यांनाच कार्यालयात येऊन काम करता येईल.

    प्रवासादरम्यानही कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधित लशीचे दोन डोस घेतले असतील तरच तुम्हाला प्रवासाची मूभा दिली जाईल.

    रेस्टोरंट, हॉटेल, खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. क्रीडा क्षेत्रात नियोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात कोणताही व्यत्यय नसेल. पण संपूर्ण स्पर्धाही प्रेक्षकांशिवाय पार पाडावी लागेल. शाळा आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. लग्न कार्यक्रमात 50 टक्के लोकांनाच परवानगी असेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.