Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»जल जीवन मिशन अंतर्गत विविध पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान
    राज्य

    जल जीवन मिशन अंतर्गत विविध पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान

    saimat teamBy saimat teamJanuary 6, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, वृत्तसंस्था । ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद, बुलडाणा, अकोला आणि नाशिक जिल्ह्यातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ग्रामीण भागाशी निगडित ही कामे वेगाने मार्गी लावता येत असल्याची भावना यावेळी श्री. पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही दुरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थिती लावून सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आणि या योजना वेळेत पूर्ण होतील आणि कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष देण्याची सूचना केली.

    मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खासदार प्रताप जाधव, आमदार अंबादास दानवे, आमदार रायमुलवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते

    राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविल्या जात आहेत. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी ओढाताण थांबावी यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

    आज झालेल्या कार्यक्रमात जानेफळ कळंबेश्वर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. मेहकर जि. बुलढाणा), चिंचोली व 30 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. खामगाव व शेगाव जि. बुलढाणा), पाडळी व 5 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. जि. बुलढाणा), 178 गावे पैठण ग्रीड पाणी पुरवठा योजना (ता. पैठण व औरंगाबाद जि. औरंगाबाद ), तेल्हारा व 69 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. तेल्हारा जि. अकोला, घाटपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. खामगाव जि. बुलढाणा) आणि घोटी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. इगतपुरी, जि. नाशिक) या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

    जल जीवन मिशन अंतर्गत 178 गावे पैठण ग्रीड पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 307 कोटी आहे. सदर योजनेअंतर्गत पैठण व औरंगाबाद तालुक्यातील 178 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. योजनेच्या रू. 307 कोटी किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

    जानेफळ कळंबेश्वर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 10 कोटी आहे. या योजनेअंतर्गत जानेफळ व कळंबेश्वर या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. योजनेच्या रू. 10 कोटी किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

    जल जीवन मिशन अंतर्गत चिंचोली व 30 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 88 कोटी 35 लक्ष आहे. सदर योजनेअंतर्गत खामगाव व शेगाव तालुक्यातील 31 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्यारू. 88 कोटी 35 लक्ष किंमतीच्या निधीसही प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

    पाडळी व 5 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 16 कोटी 09 लक्ष आहे. या योजनेअंतर्गत बुलढाणा तालुक्यातील 6 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या रू. 16 कोटी 09 लक्ष किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

    तेल्हारा व 69 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 148 कोटी 43 लक्ष आहे. या योजनेअंतर्गत तेल्हारा तालुक्यातील 70 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या रू. 148 कोटी 43 लक्ष किंमतीच्या निधीसही प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

    घाटपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रकीय किंमत रू. 18 कोटी 78 लक्ष आहे. सदर योजनेअंतर्गत घाटपुरी या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या रू. 18 कोटी 78 लक्ष किंमतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याशिवाय घोटी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या २२ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकिय मान्यता दिल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.