मुंबई
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्या महिलांची e-KYC प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांच्यासाठी सरकारने तब्बल सहा महिन्यांची मुदतवाढ दिली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
त्याचप्रमाणे, ज्या महिलांची e-KYC पूर्ण झाली आहे, मात्र त्यात काही त्रुटी किंवा चुका राहिल्या आहेत, त्यांनाही माहिती दुरुस्त करण्याची (Correction) संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहणाऱ्या लाखो महिलांचे टेन्शन आता मिटले आहे.
हप्ता वाढवण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील
योजनेचा मासिक हप्ता वाढवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, हप्ता वाढवायचा की नाही यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य वेळी घेतील. ही योजना पूर्ण क्षमतेने आणि यशस्वीपणे राबवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
