साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी गरिबी आणि वाढत्या महागाईमुळे अनेक पालकांना मुलांचे शालेय साहित्य खरेदी करणे कठीण जात आहे. हीच अडचण ओळखून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई) जळगाव जिल्हा शाखा आणि प्रज्ञावंत फाउंडेशन सरसावले आहेत. जिल्ह्यातील पत्रकार पाल्य आणि गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर व्हावी, यासाठी या दोन्ही संस्थांच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना दप्तर (स्कूल बॅग), वह्या, कंपास बॉक्स आणि पेन्सिल किट यांसारख्या आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप केले जाईल.
अशी करा नाव नोंदणी; ‘या’ कागदपत्रांची गरज
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना घरबसल्या व्हॉट्सअॅपद्वारे नोंदणी करता येणार आहे.
माहिती कुठे पाठवावी? : ९०२१९६९१०० (व्हॉट्सअॅप क्रमांक)
काय माहिती पाठवावी? : विद्यार्थ्यांचे नाव, सध्याची इयत्ता, शाळेचे नाव, मागील वर्षाचे मार्कशीट, पालकांचे नाव आणि चालू मोबाईल नंबर.
थोडक्यात पण महत्त्वाचे: नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, निवडक विद्यार्थ्यांना साहित्य वितरणाचा मुख्य कार्यक्रम कधी, कुठे आणि किती वाजता होईल, याची माहिती स्वतंत्रपणे मेसेज किंवा फोनद्वारे दिली जाणार आहे.
”आर्थिक परिस्थितीअभावी एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये आणि नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकार बांधवांच्या पाल्यांनी आणि गरजू विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि प्रज्ञावंत फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
