असे सांगितले. इंधनाच्या अभावामुळे वीज निर्मिती केंद्रांवर मोठा ताण निर्माण झाला असून, अनेक भागांमध्ये तासन्तास अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.देशातील अनेक प्रांतांमध्ये नागरिकांना दररोज तब्बल २० ते २२ तास वीज नसल्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घरगुती जीवन, व्यापार, उद्योग आणि दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. अन्नपदार्थ साठवणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रुग्णालयीन सेवा आणि इंटरनेट सुविधाही विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
आधीच अन्नधान्य, औषधे आणि इंधन टंचाईमुळे त्रस्त असलेल्या क्युबासाठी हे नवे संकट अधिकच गंभीर ठरत आहे. सरकारने गेल्या दोन वर्षांत सौरऊर्जा क्षेत्रात काही प्रमाणात प्रगती करत सुमारे १,३०० मेगावॅट क्षमतेची वाढ केली असली, तरी इंधन तुटवडा आणि कमकुवत वीज वितरण व्यवस्थेमुळे त्याचा अपेक्षित फायदा नागरिकांना मिळू शकलेला नाही.
सध्या देशातील ऊर्जा व्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत असून, सरकारसमोर तातडीने पर्यायी ऊर्जा स्रोत उपलब्ध करून नागरिकांना दिलासा देण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
