आरा टेकड्यांमध्ये धडकेनंतर आगीचे लोळ; प्रवाशांची संख्या अद्याप अस्पष्ट
साईमत / छत्तीसगड
जशपूर जिल्ह्यातील आरा टेकड्यांमध्ये एक खासगी विमान कोसळल्याची भीषण घटना घडली आहे. हे विमान डोंगराला धडकल्याने मोठी दुर्घटना झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जशपूरच्या नारायणपूर भागातील रतनपहळी जंगल परिसरात हे चार्टर्ड विमान झाडांना धडकले आणि त्यानंतर थेट डोंगरावर कोसळले. अपघातानंतर मोठा आवाज झाला असून आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट हवेत दिसत होते.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर घटनास्थळी धूर आणि आगीचे दृश्य स्पष्ट दिसत होते. विमानात किती प्रवासी होते किंवा कोण होते याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. विमान दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास सुरू आहे.
