Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश
    चाळीसगाव

    शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश

    saimat teamBy saimat teamApril 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    leopard rescue Chalisgaon Shivapur well incident
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत चाळीसगाव प्रतिनिधी

    तालुक्यातील शिवापूर शिवारात भक्षाचा पाठलाग करताना एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुखरूप बाहेर काढले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

    प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास भक्षाचा पाठलाग करत असताना हा बिबट्या थेट शेतातील विहिरीत कोसळला. विहिरीत पडल्यावर त्याने पाण्यातील पाईपला आधार घेत स्वतःचा जीव वाचवत बराच वेळ तरंगत राहिल्याची माहिती समोर आली आहे.

    ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवापूर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जळगाव जिल्ह्यात काही भागात बिबट्यांचा वावर वाढत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

    घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने वनविभाग आणि पोलिसांना कळवले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.

    दोऱ्याला खाट बांधून ती विहिरीत सोडण्यात आली आणि अत्यंत काळजीपूर्वक बिबट्याला वर काढण्यात आले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.

    बिबट्याला सुखरूप बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. तसेच या यशस्वी बचाव मोहिमेबद्दल वनविभागाचे कौतुक करण्यात येत आहे.

    Animal Rescue News Forest Department Maharashtra Jalgaon Breaking News Wildlife Rescue India
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

    April 7, 2026

    Chalisgaon : शिवापूर शिवारात दुहेरी आत्महत्येची दुर्दैवी घटना

    March 29, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.