Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»विमानतळावर टॅक्सींग करताना दोन विमानांची टक्कर झाल्याने एक मोठा अपघात टळला.
    राज्य

    विमानतळावर टॅक्सींग करताना दोन विमानांची टक्कर झाल्याने एक मोठा अपघात टळला.

    saimatBy saimatApril 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / दिल्ली

    दिल्ली विमानतळावर मोठी धक्कादायक घटना घडली आहे. स्पाईसजेट आणि अकासा एअर या दोन विमानांच्या पंखांची टक्कर झाल्याने विमानसेवा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अकासा एअरचे QP 1406 हे विमान दिल्लीहून हैदराबादला जाण्यासाठी सज्ज होते. त्याच वेळी दुसऱ्या विमानामुळे या विमानाच्या पंखाला धडक बसली. ही घटना टॅक्सींगदरम्यान घडल्याचे सांगण्यात आले आहे.

    या घटनेनंतर तातडीने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत.

    अकासा एअरच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. त्यांना हैदराबादला पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.

    दुसरीकडे, स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, टॅक्सींगदरम्यान त्यांच्या B737-700 विमानाच्या पंखांची दुसऱ्या विमानाशी टक्कर झाली. या घटनेत दुसऱ्या विमानाचे उजवे पंख आणि डावे हॉरिझॉन्टल स्टेबिलायझर नुकसानग्रस्त झाले आहे. स्पाईसजेटचे विमान सध्या दिल्ली विमानतळावर थांबवण्यात आले आहे.

    या घटनेनंतर विमान सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    जळगावसह राज्यातील बाजार समित्यांत नवा नियम लागू; कामगारांच्या आरोग्याला प्राधान्य

    April 16, 2026

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय आधार; जळगावातील १६१० रुग्णांना १३ कोटींची मदत

    April 16, 2026

    Unemployment Rate : बेरोजगारीत वाढ; शहरी भारतात नोकरीचा तुटवडा… अर्थव्यवस्थेला धक्का?

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.