Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Kakinada Express : सिग्नल बिघाडाचा गैरफायदा घेत काकीनाडा एक्सप्रेसमध्ये दरोडा
    क्राईम

    Kakinada Express : सिग्नल बिघाडाचा गैरफायदा घेत काकीनाडा एक्सप्रेसमध्ये दरोडा

    saimatBy saimatApril 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मध्यरात्री घडलेल्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण; महिला प्रवाशांना लक्ष्य करत दागिन्यांची चोरी

    साईमत / सातारा

    काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील कराड येथे सह्याद्री एक्सप्रेसवर घडलेल्या दरोड्यासारखीच घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. यावेळी परभणी जिल्ह्यातील मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ काकीनाडा साईनगर एक्सप्रेस (गाडी क्रमांक १७२०६) वर दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    बुधवारी मध्यरात्री ही गाडी परभणीच्या दिशेने येत असताना, अज्ञात चोरट्यांनी रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड केल्याने सिग्नलचा लाल दिवा लागला आणि ट्रेन थांबली. ही संधी साधत दरोडेखोरांनी थांबलेल्या ट्रेनमध्ये प्रवेश केला.

    चोरट्यांनी जनरल आणि एस-४ डब्यात शिरून थेट प्रवाशांना लक्ष्य केले. विशेषतः महिला प्रवाशांकडील सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या गेल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले.

    लूटमार केल्यानंतर दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    मोठी कारवाई! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, युपीची अट्टल ATM चोर टोळी जेरबंद

    April 15, 2026

    धुळे हादरले! गर्भपाताच्या गोळ्यांचे अतिसेवन ठरले जीवघेणे; १८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

    April 15, 2026

    Crime : जिम ट्रेनरकडून श्रीमंत महिलेचा गैरफायदा; प्रेमजाळ्यात अडकवून ब्लॅकमेल, ५ लाखांची मागणी

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.