Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»धुळे हादरले! गर्भपाताच्या गोळ्यांचे अतिसेवन ठरले जीवघेणे; १८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
    क्राईम

    धुळे हादरले! गर्भपाताच्या गोळ्यांचे अतिसेवन ठरले जीवघेणे; १८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

    saimat teamBy saimat teamApril 15, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    धुळे गर्भपात गोळ्या मृत्यू
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत धुळे प्रतिनिधी

     शहराजवळील एका गावात अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी घटना समोर आली असून गर्भपातासाठी घेतलेल्या गोळ्यांचे अतिसेवन झाल्याने १८ वर्षीय अविवाहित तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीची अचानक तब्येत बिघडल्याने तिला देवपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत डॉक्टरांना ती सुमारे २४ आठवड्यांची म्हणजेच सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. गरोदरपणा लपवण्यासाठी किंवा गर्भपात करण्याच्या उद्देशाने तिने काही औषधांचे सेवन केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    औषधांचे अतिसेवन झाल्यामुळे तिचा रक्तदाब झपाट्याने कमी झाला आणि तिला झटके येऊ लागले. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने धुळे येथील हिरे शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली.

    या घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

    दरम्यान, इतक्या प्रगत अवस्थेतील गर्भपातासाठी औषधे कोणाकडून उपलब्ध झाली, ती तरुणीपर्यंत कशी पोहोचली आणि यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. ही घटना उघड झाल्यानंतर आरोग्य आणि औषध विक्री व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

    #dhule abortion pills Devpur Hospital Dhule crime Maharashtra news Marathi news medical news police investigation shocking incident sudden death unmarried young woman young woman death
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    महा-तापमान! राज्यावर पुढील ४ दिवस ‘हिटवेव्ह’चे संकट; विदर्भासह मराठवाडा होरपळणार, वर्ध्यात शाळांना सुट्टी जाहीर

    April 15, 2026

    मोठी कारवाई! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, युपीची अट्टल ATM चोर टोळी जेरबंद

    April 15, 2026

    Crime : जिम ट्रेनरकडून श्रीमंत महिलेचा गैरफायदा; प्रेमजाळ्यात अडकवून ब्लॅकमेल, ५ लाखांची मागणी

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.