Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : अवचित हनुमानाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी घेतले दर्शन
    जळगाव

    Jalgaon : अवचित हनुमानाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी घेतले दर्शन

    saimatBy saimatApril 2, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक विधींसह रक्तदान शिबिर लोण्याच्या साडेआठ फूट मूर्तीने वेधले लक्ष 

    साईमत /जळगाव / प्रतिनिधी

    जळगाव शहरापासून सुमारे १५ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या अवचित हनुमान या जागृत देवस्थानात हनुमान जयंतीनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता.

    हनुमान जयंतीच्या निमित्ताने दिवसभर मंदिरात अभिषेक, पूजन, आरती आदी धार्मिक विधी पार पडले. विशेष आकर्षण ठरली ती सुमारे साडेआठ फूट उंचीची लोण्यापासून साकारलेली हनुमानाची भव्य मूर्ती. या अद्वितीय मूर्तीमागे स्थानिक श्रद्धा आणि परंपरेचा वारसा दडलेला आहे.

    स्थानिक आख्यायिकेनुसार, परिसरातील शेतकरी आणि भाविक आपल्या जनावरांकडून भरपूर दूध मिळावे तसेच शेतीत भरभराट व्हावी या इच्छेने अवचित हनुमानाला नवस करतात. नवस पूर्ण झाल्यानंतर ते लोणी, दूध आणि दही अर्पण करतात. या अर्पणातून जमा झालेल्या लोण्यापासूनच ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.

    विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील तापमान सध्या ४० ते ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत असतानाही या लोण्याच्या मूर्तीवर उष्णतेचा कोणताही परिणाम होत नाही. ही बाब भाविकांसाठी आश्चर्य आणि श्रद्धेचा विषय ठरत असून, त्यामुळे या देवस्थानाचे महत्त्व अधिक वाढले आहे.

    हनुमान जयंतीनिमित्त मंदिर २४ तास खुले ठेवण्यात आले होते. मध्यरात्री पारंपरिक पद्धतीने लोणी लेपनाचा विशेष कार्यक्रम पार पडला. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिर प्रशासनाने योग्य नियोजन करून सुलभ दर्शनाची व्यवस्था केली होती.

    यावेळी सामाजिक बांधिलकी जपत रेड प्लस ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत रक्तदान केले. धार्मिक उत्सवाबरोबर समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची ही परंपरा स्तुत्य असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

    मंदिराचे मुख्य पुजारी दीपक महाराज यांनी सांगितले की, अवचित हनुमान हे जागृत देवस्थान असून येथे नवस केल्यावर भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, असा दृढ विश्वास आहे. अनेक भाविकांनी आपल्या अनुभवातून या श्रद्धेला दुजोरा दिला असून, मंदिराविषयीचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Dharangaon : हनुमान जयंतीनिमित्त मारुती मंदिरांचे भूमिपूजन

    April 2, 2026

    Jalgaon : जिल्हाधिकारी कार्यालयात ६ एप्रिल रोजी लोकशाही दिन आयोजित

    April 2, 2026

    Jalgaon : जळगाव-भुसावळ महामार्गावर भीषण अपघात

    April 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.