Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : जळगाव महापौरांचा कडक इशारा कचरा डेपो कामे युद्धपातळीवर पूर्ण करा
    जळगाव

    Jalgaon : जळगाव महापौरांचा कडक इशारा कचरा डेपो कामे युद्धपातळीवर पूर्ण करा

    saimatBy saimatApril 1, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कचरा साचल्यामुळे दुर्गंधी; महापौरांनी काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    साईमत /जळगाव / प्रतिनिधी:

    शहरातील स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या घनकचरा डंपिंग ग्राऊंडवरील समस्यांवर अखेर निर्णायक हालचाल सुरू झाली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत रखडलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

    बैठकीत कचरा डेपोच्या कंपाऊंड वॉल, रॅम्प आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासकीय दिरंगाई आणि तांत्रिक अडचणींमुळे ही कामे दीर्घकाळ रखडली होती. नागरिकांकडून वाढलेल्या तक्रारींमुळे दुर्गंधी आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली गेली.

    श्री श्री इन्फ्रा या मक्तेदारांनी सांगितले की, सुमारे ८५ हजार चौ.फुट क्षेत्रात ६ मीटरपर्यंत कचरा साचलेला आहे. जमिनीचा उंच-सखलपणा आणि कचऱ्याचा थर यामुळे कंपाऊंड वॉल आणि रॅम्पचे काम करण्यासाठी प्रथम बायोमायनिंग आणि कचरा हटविणे आवश्यक आहे.

    शहर अभियंता योगेश बोरोले यांनी स्पष्ट केले की, मूळ अंदाजपत्रकात खोदकाम आणि कचरा वाहतुकीचा समावेश नव्हता. त्यामुळे शिल्लक निधीतून वाढीव कामासाठी सुधारित प्रस्ताव तयार केला जाणार आहे. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पुढील २५ दिवसांत बायोमायनिंग पूर्ण करण्याचे आणि मनपाच्या यंत्रणेद्वारे कचरा बाजूला करण्याचे निर्देश दिले.

    महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि दुर्गंधी रोखण्यासाठी कंपाऊंड वॉलचे काम प्राधान्याने सुरू करणे गरजेचे आहे. मनपाने जागा उपलब्ध करून दिल्यानंतर मक्तेदारांनी एका दिवसही विलंब न करता काम सुरू करावे. रॅम्पच्या कामाला स्थानिक विरोध झाल्यास पोलीस बंदोबस्तात काम पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

    या बैठकीस उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सहाय्यक आयुक्त उदय पाटील, शहर अभियंता योगेश बोरोले आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल, सलग चौथ्या वर्षी विक्रम कायम

    April 1, 2026

    डिजिटल व्यवहारांसाठी ‘डबल सुरक्षा’ बंधनकारक; १ एप्रिलपासून नवे नियम लागू

    April 1, 2026

    Jamner : जुन्या वादातून महिलेवर विनयभंग; दोन भावंडांविरोधात गुन्हा

    April 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.