Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon : बळीराम पेठेत बंद घरावर चोरट्यांचा डल्ला
    क्राईम

    Jalgaon : बळीराम पेठेत बंद घरावर चोरट्यांचा डल्ला

    saimatBy saimatApril 1, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Gang of thieves raids locked house in Baliram Peth
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    डॉक्टरच्या घरातून ३२ हजारांचा ऐवज लंपास

    साईमत /जळगाव / प्रतिनिधी:

    शहरातील बळीराम पेठ परिसरात बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा पुन्हा एकदा डाव यशस्वी ठरला असून, एका नामांकित डॉक्टरच्या घरावर डल्ला मारत सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम पेठ येथील रहिवासी डॉ. अजिजुल्ला इस्माईल शेख (वय ६२) हे २६ मार्च रोजी दुपारी सुमारास आपल्या कुटुंबासह पुणे येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेवून चोरीची योजना आखली.

    दरम्यान, चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाची कडी-कोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर त्यांनी कपाटे उचकापाचक करत मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला. ३१ मार्च रोजी डॉ. शेख कुटुंबासह परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात प्रवेश करताच कपाटातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसले आणि सोन्याचे दागिने व रोकड गायब असल्याचे स्पष्ट झाले.

    या चोरीत चोरट्यांनी सुमारे ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

    दरम्यान, शहरात बंद घरांवर लक्ष ठेवून चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. पोलिसांनीही गस्त वाढवून अशा चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव महापौरांचा कडक इशारा कचरा डेपो कामे युद्धपातळीवर पूर्ण करा

    April 1, 2026

    डिजिटल व्यवहारांसाठी ‘डबल सुरक्षा’ बंधनकारक; १ एप्रिलपासून नवे नियम लागू

    April 1, 2026

    Jamner : जुन्या वादातून महिलेवर विनयभंग; दोन भावंडांविरोधात गुन्हा

    April 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.