Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : बंद घर फोडून ५० हजारांची रोकड लंपास; जळगावात घरफोड्यांची मालिका सुरूच
    जळगाव

    Jalgaon : बंद घर फोडून ५० हजारांची रोकड लंपास; जळगावात घरफोड्यांची मालिका सुरूच

    saimatBy saimatMarch 31, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Rs 50,000 cash stolen after breaking into a locked house; Series of house burglaries continue in Jalgaon
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    साईमत जळगाव प्रतिनिधी:

    जळगाव शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असताना, जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. बंद घरावर लक्ष ठेवून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

    शहरातील यश हाइट्स समोरील राजयोग गुरुदत्त नगर भागात ही घटना घडली. अमोल गंगाधरराव भेंडे (वय ३८) हे खाजगी नोकरी करतात. २६ मार्च रोजी रात्री ८ वाजेपासून ते ३० मार्चच्या पहाटे ४.३० वाजेपर्यंत त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

    घरात ठेवलेली सुमारे ५० हजार रुपयांची रोकड चोरट्याने चोरून नेली. ३० मार्च रोजी सकाळी घरफोडी झाल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.

    या प्रकरणी अमोल भेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी रवींद्र ठाकरे करत असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

    दरम्यान, शहरात सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलीसांनी गस्त वाढवावी आणि अशा गुन्ह्यांवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Paladhi : भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक निकाल जाहीर सोहळा उत्साहात

    March 31, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर पेट्रोल पंपवर धक्कादायक प्रकार

    March 31, 2026

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील E-KYC आजच पूर्ण करा; 31 मार्च शेवटची तारीख

    March 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.