Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : मोहाडीतील भव्य हिंदू मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
    जळगाव

    Jalgaon : मोहाडीतील भव्य हिंदू मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

    saimatBy saimatMarch 30, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दिंडीसोहळ्याने रंगली सुरुवात मेळाव्याला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद

    साईमत जळगाव प्रतिनिधी:

    जाती-पातींच्या भिंती दूर करून हिंदू समाजाने एकसंघपणे पुढे यावे, या उदात्त उद्देशाने जळगाव शहरातील मोहाडी येथील मारुती मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य हिंदू मेळाव्याला रविवारी (दि. २९ मार्च) नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने परिसरात सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश दिला.

    मेळाव्याची सुरुवात सायंकाळी ४ वाजता मोहाडी गावातून काढण्यात आलेल्या भव्य दिंडी सोहळ्याने झाली. विठ्ठल-रखुमाईच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने निघालेल्या या दिंडीमुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात रंगून गेले. दिंडीत मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

    सायंकाळी ६ वाजता मारुती मंदिर परिसरात मुख्य मेळाव्याला प्रारंभ झाला. या वेळी आदिकवी महर्षी वाल्मिकी गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. योगीराज महाराज कानडदेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून समाजात आध्यात्मिक मूल्ये जोपासत एकता राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

    तसेच, विश्व हिंदू परिषदेचे प्रखर वक्ते देवेंद्र भावसार यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून हिंदू समाजाने विखुरलेपण सोडून संघटित शक्ती म्हणून उभे राहण्याची गरज स्पष्ट केली. त्यांनी सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य आणि सांस्कृतिक जपणूक यावर विशेष भर दिला.

    या मेळाव्याचा मुख्य उद्देश हिंदू समाजातील अंतर्गत भेदभाव दूर करून सर्वांना एका सूत्रात बांधणे हा होता. कार्यक्रमामुळे मोहाडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.

    या यशस्वी आयोजनासाठी मोहाडी येथील सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने नियोजन केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रम सुरळीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव मनपात प्रवेशावर ‘पास’ सक्ती महापौरांचे ठाम आदेश

    March 30, 2026

    Jalgaon : महापालिकेची पहिली महासभेत सत्ताधारींनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

    March 30, 2026

    Jalgaon : प्रेस फोटोग्राफर संघ ठरला पत्रकार प्रीमियर लीग पर्व-२ विजेता

    March 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.