Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Accident : दर्शनासाठी निघालेल्या वाहनाच्या अपघातात दोन अल्पवयीनांचा मृत्यू, 16 जखमी
    जळगाव

    Accident : दर्शनासाठी निघालेल्या वाहनाच्या अपघातात दोन अल्पवयीनांचा मृत्यू, 16 जखमी

    saimatBy saimatMarch 29, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / बुलढाणा / प्रतिनिधी

    जिल्ह्यात एका भीषण अपघातात दोन अल्पवयीन युवकांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात असलेल्या वाहनाचा अपघात झाला असून, कुटुंबातील या दोघांना जीव गमवावा लागला. अपघाताच्या वेळी वाहनामध्ये एकाच कुटुंबातील 23 भाविक प्रवास करत होते, ज्यापैकी 16 जण गंभीर जखमी झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील बागवान कुटुंब सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात होते. मेहकर तालुक्यातील नांद्रा फाटा जवळ चालकाचे वाहन नियंत्रणाबाहेर गेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाची झोप लागल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता आहे.

    अपघातात जागीच मृत्यू झालेल्यांमध्ये अरमान शरीफ बागवान (वय 16) आणि रिहान सैदु बागवान (वय 17) यांचा समावेश आहे. वाहन उलटल्यामुळे ते त्यात अडकून राहिले.

    जखमींवर तातडीने मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी काही रुग्णांना खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

    घटनेची माहिती मिळताच माजी आमदार संजय रायमुलकर आणि योगेश सौभागे विलास आखाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींची तातडीने मदत करून रुग्णालयात दाखल केले, उपचाराची व्यवस्था केली आणि स्थिर रुग्णांसाठी चहा, पाणी व बिस्किटांची सोय केली. तसेच ॲम्बुलन्सची व्यवस्था करून सामाजिक दायित्व पार पाडले.

    ही घटना कुटुंबावर शोककळा पसरवणारी असून, स्थानिक प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते जखमींवर सतत लक्ष ठेवत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : सुप्रीम कॉलनीमध्ये मराठी वाचनालय ज्ञानाचा नवा दरवाजा खुला

    March 29, 2026

    Jalgaon : अज्ञात वाहनाच्या धडकेत ७० वर्षीय वृद्ध महिलेचा दुदैवी मृत्यू

    March 29, 2026

    Gold Silver Crash : सोने-चांदीच्या किमतीत चढ-उतार; चांदी 2.11 लाख स्वस्त, सोने अजूनही महागातून 55 हजार स्वस्त

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.