Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Shocking Train Incident : नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर थरकाप; आईने ८ वर्षीय मुलीला चालत्या रेल्वेसमोर ढकलले
    क्राईम

    Shocking Train Incident : नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर थरकाप; आईने ८ वर्षीय मुलीला चालत्या रेल्वेसमोर ढकलले

    saimatBy saimatMarch 19, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Pachora: Youth brutally murdered over pornographic video, husband and wife arrested
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / भोपाळ / प्रतिनिधी

    भोपाळजवळील नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर मंगळवारी संध्याकाळी हृदयद्रावक घटना घडली. एका महिलेने आपल्या आठ वर्षांच्या मुलीला चालत्या रेल्वेसमोर ढकलल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गंभीर जखमी झालेली मुलगी सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिला सरकारी कर्मचारी असून ती माळखेडा परिसरात राहते. पतीच्या निधनानंतर तिला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. घटना घडण्यापूर्वी मायलेकी सुमारे तीन तास स्थानकावर थांबल्या होत्या. सायंकाळी सुमारे ७:४० वाजता तामिळनाडू एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येत असताना महिलेने अचानक मुलीला रुळावर ढकलले. मुलगी इंजिनला धडकून प्लॅटफॉर्म आणि रुळांच्या मधील जागेत अडकली.

    रेल्वे पुढे गेल्यानंतर उपस्थित प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. मात्र, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, मदत करणाऱ्यांना आईनेच “तिला वाचवू नका” असे वारंवार सांगितल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

    या अपघातात मुलीच्या डोक्याला, कंबरेला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी भोपाळ येथे हलवण्यात आले असून ती व्हेंटिलेटरवर आहे. डॉक्टरांनी तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले.

    दरम्यान, पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून प्राथमिक तपासात ती मानसिक आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस तिच्या वैद्यकीय नोंदींची तपासणी करत असून कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora:पाचोरा बायपासवर भरधाव ट्रक पलटला

    March 19, 2026

    Jalgaon:जळगाव भगवेमय हिंदू नववर्ष स्वागत यात्रा भक्तिपूर्ण रंगात रंगली

    March 19, 2026

    Jalgaon Murder : जळगावात कौटुंबिक वादाचा अंतःस्थळ: पत्नीची लोखंडी विळ्याने निर्घृण हत्या

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.