Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»पुणे»Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; लोणी देवकर परिसरात ३ जण ठार
    पुणे

    Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; लोणी देवकर परिसरात ३ जण ठार

    saimatBy saimatMarch 17, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    क्रूझर जीप ट्रकला भिडली, टायर फुटल्याने नियंत्रण सुटलं

    साईमत / पुणे / प्रतिनिधी

    पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर परिसरात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, क्रूझर जीपचा टायर फुटल्यामुळे नियंत्रण सुटून जीप दुभाजक ओलांडत समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. या अपघातात क्रूझरमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

    मृतांमध्ये चालक प्रमोद बाळासो खवळे (वय 28, रा. मदनवाडी), शशांक कोटिया (वय 32, रा. गौतमनगर, ग्वालियर) आणि विजयसिंह राजपूत (वय 35, रा. त्रिलोकनगर, मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे. प्राथमिक माहिती नुसार, तिघेही लोणी देवकर एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत काम करत होते.

    पोलिसांनी सांगितले की, MH 14 LB 1613 क्रमांकाची जीप पुण्याकडून सोलापूरकडे जात असताना टायर फुटल्यामुळे जीप नियंत्रणाबाहेर झाली. धडक इतकी जबरदस्त होती की जीपचा समोरील भाग चुराडा झाला. घटनास्थळी इंदापूर महामार्ग पोलीस तातडीने पोहोचले आणि वाहतूक सुरळीत केली.

    कोकण-कोल्हापूर जोडणाऱ्या करूळ घाटात इथेनॉल टँकर पलटी; चालक जखमी
    कोकणात कारूळ घाटात इथेनॉलने भरलेला टँकर पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला वैभववाडी पोलिसांच्या मदतीने क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले गेले. त्याच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली असून, वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. MH 09 FL 7165 क्रमांकाचा टँकर चालक नकाप्पा डोईफोडे वारणा येथून गोव्याला जात होता. गगनबावडापासून काही अंतरावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे टँकर डोंगराकडील गटारात पलटी झाला. टँकरचा दर्शनी भाग चक्काचूर झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pune Accident : “पुण्यात भीषण अपघात: तरुणाचा जागीच मृत्यू, पिकअप चालक फरार”

    March 18, 2026

    Maharashtra Weather : गुढीपाडव्याला मुंबईसह राज्यभरात पावसाचा इशारा

    March 17, 2026

    Pune Crime : पुणे वाघोलीत चहा पिताना तरुणावर जीवघेणा कोयता हल्ला; आरोपी अटक

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.